भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज तसेच अँग्री यंग मॅन म्हणून ओळख असलेला गौतम गंभीरने एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ पोस्ट शेअर केला आहे.
या व्हिडिओत त्याने क्रिकेट जगताला अलविदा म्हटले आहे.
आयपीएल सामन्यातील शाहरूखच्या कोलकाता नाइट राइडर्स या संघाचे गौतम गंभीर नेतृत्व करत होता. त्याने शाहरूखच्या संघाला दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे शाहरूख आणि गौतम गंभीर यांच्यात जवळीक वाढली होती.
असा होता किंग खान सोबतचा प्रवास –
मात्र, त्याने आता सर्व क्रिकेट सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर किंग खानने ट्वीट करत गौतम गंभीरला म्हटले आहे की, संघाला दिलेल्या प्रेमासाठी आणि नेतृत्वासाठी धन्यवाद. तू एक खास माणूस आहेस आणि परमेश्वर तुला नेहमीच आनंदी ठेवेल,आनंदी रहा… आणि थोडं हसत ही रहा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.