मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेतील सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला. भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनल सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. रविवार, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध भारत यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याला त्याने सेमिफायनलपूर्वी केलेल्या भविष्यवाणीवर “ढोंगी बाबा” म्हणत टीका केली आहे.
हेही वाचा- IND vs NZ Final Abhishekh Sharma : “आम्हाला जशी गरज पडेल तसं…” फायनलमधून अभिषेक शर्माची एक्झिट? कॅप्टनने केला मोठा खुलासा
मोहम्मद अमीरने म्हटलं होत की, टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहचणं कठीण होईल. सेमीफायनलमध्ये इंग्लंड भारताला पराभूत करून विजयी होईल. मात्र भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवल्यानंतर त्याने पलटी घेतली. इंग्लंड सामना जिंकू शकला असता, परंतु एका महत्त्वाचा कॅच सोडल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. जर हॅरी ब्रूकने संजू सॅमसना कॅच पकडला असात तर इंग्लंडचा संघ त्यांचं लक्ष्य गाठू शकला असता, असे आमिर म्हणाला. त्याने केलेल्या या भाकितावर नवजोत सिंग सिद्धू म्हणाला की, “आपल्या शेजारच्या काही लोकांना खोटं भाकित करण्याची सवय असते.‘बनी तो बनी, नाही तर अब्दुल घनी’, जर त्यांचे भाकितं बरोबर निघालं तर ते शहाणे. लागला तर बाण, नाहीतर तुक्का. तरीही बाबा बनून बसले आहेत. मला तर वाटतं ढोंगी बाब… आधी म्हणाले, भारत क्वालिफाय होणार नाही, सेमीफायनलला जाणार नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका पुढे जातील, असे सांगत होते. संजू सॅमसनचा कमबॅक झाला आणि दोन्ही संघ ‘गो बॅक’ झाले. म्हणून सांगतो, अशा गोष्टी भविष्यवाणीने ठरत नाहीत, त्याचे निर्णय मैदान-ए-जंगमध्ये घेतले जातात. भीक मागून कोणाला तख्तो-ताज मिळत नाही. थोथा चना बाजे घना….”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.