IND vs SL 1st Test Galle: भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी एक मजेशीर घटना घडली. प्रभात जयसूर्या टाकत् असलेल्या 11व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंचांनी केएल राहुलला पायचित (LBW) बाद घोषित केले होते. पंचांच्या निर्णयावर विश्वास ठेवून भारतीय उपकर्णधार थेट पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. मात्र, दुसऱ्या टोकाला उभा असलेला देवदत्त पडिक्कल तात्काळ राहुलजवळ धावला आणि त्याने त्याला डीआरएस (DRS) घेण्याचा सल्ला दिला. पडिक्कलच्या या सूचनेवरून राहुलने रिव्ह्यू घेतला आणि तिसऱ्या पंचांनी राहुलला नाबाद घोषित केलं. यामुळे भारताची मोठी विकेट पडण्याचे टळले.
मैदानावरच मारली मिठी; जीवदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्टी सोडून बाहेर जात असल्याचे दिसताच मैदानावर सर्वच जण अवाक झाले, तर ड्रेसिंग रूममध्ये मैदानात येण्यासाठी तयार असलेला कर्णधार शुभमन गिलही थांबला. जीवदान मिळताच आनंदाच्या भरात राहुलने देवदत्त पडिक्कलला तात्काळ मिठी मारली आणि त्याला किस करण्याचा मजेशीर प्रयत्न केला. कॅमेऱ्यात कैद झालेला हा मैत्रीपूर्ण आणि मजेशीर क्षण सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. पडिक्कलच्या सतर्कतेमुळे राहुलची विकेट वाचली, मात्र मिळ मिळालेल्या या संधीचे राहुलला मोठे रुपांतर करता आले नाही.
KL Rahul and Devdutt Padikkal bromance♥️? https://t.co/trrJKVN6Hf — Karnataka Sports Fans (@karnataka_sport) August 18, 2026
नेटकऱ्यांकडून व्हिडिओ शेअर आणि कमेंटसचा पाऊस
या विशेष क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. केएल राहुलने पडिक्कलला मारलेली मिठी आणि मैदानावरच हेल्मेटमधूनच किस करण्याच्या या मजेशीर प्रसंगाचे व्हिडिओ तुफान शेअर केले जात आहेत. क्रिकेट चाहत्यांनी या प्रसंगावर भन्नाट प्रतिक्रिया देत दोघांमधील निखळ मैत्री आणि मैदानातील उत्कृष्ट ताळमेळाचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत पडिक्कलच्या समयसूचकतेची प्रशंसा केली, तर काही जण राहुलच्या मजेशीर रिॲक्शनवर विनोदी कमेंट्स करत आहेत. हा क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरील ट्रेंडिंग विषय बनवला आहे.
? KL Rahul tries to kiss Devdutt Padikkal after he saves his wicket? KL Rahul was given out LBW by the umpire and, without taking a review, started walking towards the dressing room.
But Devdutt Padikkal quickly went up to Rahul and told him to take the DRS. Rahul took the… pic.twitter.com/5mcilis8FX — Central Cricket (@arshdeep3444) August 18, 2026
"KL Rahul thanks Devdutt Padikkal for pushing him to take the DRS review?♥️."#SLvsIND #INDVSSL pic.twitter.com/FgxBhCxufh — Ak (@AkashRa29975360) August 18, 2026
हेही वाचा – IND vs SL 1st Test : गॉल कसोटीत दुर्दैवी घटना; सीमेवर चौकार अडवताना दिग्गज खेळाडू जखमी
35 धावांवर राहुल बाद; 65 धावांच्या भागीदारीनंतर भारताचे फलंदाज पुन्हा अडचणीत
मिळालेल्या या जीवदानानंतरही काही षटकांतच 15 व्या षटकात जयसूर्याचा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल 35 धावांवर झेलबाद झाला. त्याने 47 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तत्पूर्वी, पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल शून्य धावेवर बाद झाल्यानंतर राहुल आणि पडिक्कल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 65 धावांची सावरणारी भागीदारी रचली होती. राहुल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलही अवघ्या 8 धावा करून माघारी परतला.
पडिक्कलचे अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकले; लंचपर्यंत भारताकडे 294 धावांची आघाडी
दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचे अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकले. त्याने 75 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 44 धावांची महत्त्वाची खेळी केली. चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात 4 बाद 116 धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा – Arjuna Award 2025: नागपूरची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.