ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट जवळपास तासभर चालली. या बैठकीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याने हकालपट्टी केली आहे.
काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
यामध्ये निवेदनात पक्षविरोधी कारवायांमुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेस पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
याबाबतची माहिती कांग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन दिली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या एकूण १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिंदे पक्ष आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही महिन्यापूर्वी ट्विटर बायोमधून काँग्रेस असा उल्लेख हटवला होता.
दरम्यान ज्योतिरादित्य शिंदेंच्या राजीनाम्यानंतर त्यांना भाजप राज्यसभेवर घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मध्यप्रदेश विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ही 230 इतकी आहे. २ आमदारांचा मृत्यू झाला आहे. यानुसार विधानसभेची एकूण सभासदसंख्या ही २२८ इतकी आहे.
काँग्रेसचे एकूण ११४ आमदार आहेत. तर सरकार स्थापनेसाठी ११५ हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेसला ४ अपक्ष, बसपच्या २ आणि आणि सपाच्या १ आमदाराचं समर्थन आहे.
यानुसार काँग्रेसचे एकूण संख्याबळ हे १२१ इतके आहे. तर भाजपकडे १०७ आमदार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.