Squash World Cup मध्ये भारताने रचला इतिहास; हाँगकाँगवर 3-0 ची दणदणीत मात

चेन्नई येथे झालेल्या स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने हॉंगकॉंग संघाला 3-0 ने पराभूत करत इतिहास रचला.
Squash World Cup मध्ये भारताने रचला इतिहास; हाँगकाँगवर 3-0 ची दणदणीत मात

चेन्नईत झालेल्या स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 च्या (Squash World Cup 2025) अंतिम सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत टॉप सीड हॉंगकॉंग (चीन) संघाला 3-0 ने पराभूत केले आणि इतिहास रचला. या विजयासह भारताने या प्रतिष्ठित स्पर्धेतील आपले पहिले वर्ल्ड कप जेतेपद जिंकले. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न हरता थेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत म्हटले की, “एसडीएटी स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन. जोशना चिनप्पा, अभय सिंह, वेलवन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंह यांनी दाखवलेली जिद्द आणि निर्धार देशासाठी अभिमानास्पद आहे. या विजयामुळे तरुणांमध्ये स्क्वॉशबद्दलचा उत्साह वाढेल.”

अंतिम सामन्याची सुरुवात अनुभवी जोशना चिनप्पाने दमदार विजयाने केली. तिने हॉंगकॉंगच्या का यी ली हिला 3-1 (7-3, 2-7, 7-5, 7-1) असे हरवत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 39 वर्षीय जोशनाने आपल्या अनुभवाचा आणि कोर्टक्राफ्टचा उत्कृष्ट वापर करत सामना आपल्या बाजूने वळवला. यानंतर भारताचा अव्वल पुरुष खेळाडू अभय सिंह याने एलेक्स लाउ याला सरळ सेटमध्ये 3-0 (7-1, 7-4, 7-4) असे पराभूत करत भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.

हेही वाचा: R-37M Missile India: भारताच्या हवाई ताकदीत मोठी वाढ, रशियाकडून घातक क्षेपणास्त्र खरेदीच्या तयारीत

निर्णायक सामन्यात 17 वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंह हिने टोमाटो हो हिला 3-0 (7-2, 7-2, 7-5) असे हरवत भारताचा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे अनाहत ही स्पर्धेतील सर्वात कमी वयाची खेळाडू होती.

या स्पर्धेतील भारताचा प्रवासही तितकाच प्रभावी ठरला. ग्रुप टप्प्यात भारताने स्वित्झर्लंड आणि ब्राझीलला 4-0 ने मात दिली. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने पराभव केला, तर उपांत्य फेरीत दोन वेळच्या विजेत्या इजिप्त संघाला 3-0 ने हरवत अंतिम फेरीत धडक दिली. या विजयासह भारत स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला असून, हा क्षण भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाचा मानला जात आहे.

हेही वाचा: Aditya Thackeray On BJP: ‘भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी…’; पागडी इमारतींच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version