Womens World Cup 2025: भारत-पाक महिला क्रिकेट सामना : बीसीसीआयचा मोठा आदेश, पाक खेळाडूंशी हस्तांदोलन टाळा

बीसीसीआयने भारतीय महिला संघाला पाकिस्तानी खेळाडूंशी सामन्याच्या आधी किंवा नंतर हस्तांदोलन टाळण्याचे थेट आदेश दिले आहेत.
Womens World Cup 2025: भारत-पाक महिला क्रिकेट सामना : बीसीसीआयचा मोठा आदेश, पाक खेळाडूंशी हस्तांदोलन टाळा

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेट सामना हा नेहमीच चर्चेचा आणि तणावाचा विषय ठरतो. यंदाच्या महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लढतीपूर्वी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान क्रिकेट वाद टोकाला गेला आहे.

आशिया कपदरम्यान पुरुष संघांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर आता महिला संघांवरही त्याचे सावट आलेले दिसत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला संघाला थेट आदेश दिले आहेत की, सामन्याच्या आधी किंवा नंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी करण्याचे टाळावे. आम्ही तुमच्या सोबत असू. ही सूचना 1 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या जबाबदारीची हमी घेत देण्यात आली आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पाकिस्तानला ‘दुश्मन देश’ अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने हा मुद्दा आणखी तापला आहे. मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यावर ठाम भूमिका घेतली असून, "संघाने कोणत्याही परिस्थितीत हस्तांदोलन करू नये," असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सामना कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. कारण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपला महिला संघ भारतात पाठवण्यास नाकारलं होतं.

या सर्व घडामोडींमध्ये आशिया कप 2023 मधील ट्रॉफी विवादाने आणखी रंग भरला आहे. अंतिम सामना जिंकून भारताने विजेतेपद मिळवले असतानाही, ACC प्रमुख व PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी याने ट्रॉफी देण्यास टाळाटाळ केली, असा बीसीसीआयचा आरोप आहे. या संदर्भात बीसीसीआयने त्यांना अल्टिमेटम दिला असून, लवकर तोडगा निघाला नाही तर आयसीसीकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.

या पार्श्वभूमीवर भारत-पाक महिला सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले असून, भारत- पाक तणावपूर्ण वातावरण आणि वादविवाद याचा परिणाम मैदानावरही जाणवण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version