आज 31 मे रोजी आयपीएल 2026 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सामन्यातून आयपीएल 2026 चा विजेता संघ मिळणार आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघाकडे आतापर्यंत एक-एक अशी आयपीएल ट्रॉफी आहे. तर आज दोन्ही संघाकडे दुसरी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आज कोणता संघ दुसरी आयपीएल ट्रॉफी घेऊन जातो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आजचा सामना अहमदाबादमधील हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर आज अहमदाबादमध्ये पाऊस पडला आणि अंतिम सामन्यावर हवामानाचा परिणाम झाला तर हा सामना रद्द झाल्यास विजेता संघ कसा ठरवला जाईल? आयपीएल नियमानुसार, पाऊस पडल्यास षटके कमी केली जाऊ शकतात. यावेळी दोन्ही संघांना प्रत्येकी किमान पाच षटके खेळणे बंधनकारक असते. तसेच दुसरं म्हणजे, जर सामन्याच्या दिवशी पावसामुळे सामना रद्द झाला, तर तो राखीव दिवशी खेळवला जातो.
मात्र जर राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर तो रद्द मानला जाईल. मात्र विजयी संघ निवडताना आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केला जाईल. त्याप्रमाणे आरसीबी हा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आयपीएल 2026 ची ट्रॉफी जिंकून सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनेल. दरम्यान गुजरातसह आरसीबीची नजर दुसऱ्या ट्रॉफीवर आहे, त्यामुळे कोणाचं स्वप्न पूर्ण होत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.