‘देशमुखांना अडकवण्याची किंमत चुकवावी लागेल’ – शरद पवार

‘देशमुखांना अडकवण्याची किंमत चुकवावी लागेल’ – शरद पवार

  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाष्य केले आहे. ‘देशमुखांना अटकवण्याची आज न उद्या किंमत चुकवावी लागेल’,  असे ट्विट करत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

  १०० कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुखांच्या कोठडीची किंमत केंद्र सरकारला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे

  शरद पवारांनी ट्विट केले की, ‘देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्यांची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून गेल्यावर असं घडतं.’

  शरद पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवर भाष्य करत अनिल देशमुखांना अटकवण्याची आज न उद्या किंमत चुकवावी लागेल असे ट्विट करत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी देशमुखांची पाठराखण करत पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख बाहेर येतील अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version