Crude Oil Information | इराण- अमेरिका (Iran vs Us War) युद्धामुळे जगातल्या अनेक देशांवर तेलसंकट येऊ घातलं आहे. भारतातही गॅसचा तुटवडा (Gas Shortage) निर्माण झालाय. त्यामुळे कच्च्या तेलाचेही दर वाढलेत. आधुनिक जगात कच्चे तेल हे केवळ इंधन नसून, जागतिक अर्थव्यवस्थेचा (World Economy) कणा बनलंय. पण कच्चं तेल कसं तयार होतं? आणि ते बॅरलमध्येच का मोजतात?
कच्च्या तेलाला इंग्रजीत क्रूड ऑईल (Crude Oil) असं म्हटलं जातं. कच्चं तेल हे जमिनीखालील खडकांमध्ये आढळणारे नैसर्गिक, काळपट आणि घट्ट असं खनिज तेल आहे. ते हायड्रोकार्बन्सचे (Hydrocarbons) मिश्रण असून त्यापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि डांबर बनवले जाते. कच्चं तेल हे जमिनीच्या पोटातून किंवा समुद्राच्या तळाशी विहिरी खोदून काढले जाते. कच्चे तेल जमिनीखालून काढल्यावर थेट वापरता येत नाही. त्यावर रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून, त्याच्या उकळण्याच्या तापमानानुसार घटक वेगळे केले जातात. रिफायनिंग टॉवरमध्ये जेव्हा कच्चे तेल गरम केले जाते, तेव्हा डांबर सर्वात खाली राहते आणि पेट्रोल/गॅसेस सर्वात वरच्या बाजूला गोळा होतात… जगातील 75% पेक्षा जास्त तेलाचे साठे हे आखाती देशात आहेत. ज्यामध्ये इराण, इराक, सौदी अरेबिया, इस्रायल कुवैत, कतार, ओमान यांसारख्या देशांचा समावेश होतो.
कच्च्या तेलाचा उल्लेख होताना ‘बॅरल’ (Barrel) हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल हे ‘बॅरल’ मध्ये मोजलं जातं. तर आंतरराष्ट्रीय किंमतही ‘डॉलर प्रति बॅरल’ (Dollar per Barrel) मध्येच मोजली जाते. एक बॅरलमध्ये साधारणपणे 159 लिटर कच्चं तेल असतं, जे अंदाजे 42 अमेरिकन गॅलन इतकं असतं. 1860 च्या दशकात अमेरिकेत तेल उत्पादकांनी 42 गॅलनच्या बॅरलला मानक मानले, कारण त्यावेळी तेलाची वाहतूक करण्यासाठी हे सर्वात सोयीस्कर साधन होते. हे प्रमाण आजही जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती आणि वितरणासाठी वापरले जाते, कारण यामुळे मोजमापात पारदर्शकता राहते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.