अमरावतीत ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला अटक

अमरावतीत ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधमाला अटक

राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये ५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अमरावतीमध्ये २५ वर्षीय नराधमाने ७ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अजय तेलगोटे असे या नराधमाचे नाव असून या नराधमाने चिमुकलीवर दोन वेळा बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबियांनी रहमापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली. त्यानंर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीचा तपास करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच याप्रकरणामुळे पोलिसांनी या नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास रहिमापूर पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version