नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी

हँगझोऊ, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एशियाडमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकले. नीरजने ८८.८८ मीटर अंतरावर भाला फेकला. याआधी नीरजने २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. नीरजने एशियाडमध्ये जिंकलेले हे दुसरे सुवर्ण पदक आहे.

हँगझोऊ एशियाडमध्ये भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण तर किशोर कुमारने रौप्य पदक जिंकले. याआधी आदल्या दिवशी महिलांच्या भालाफेकमध्ये भारताने सुवर्ण जिंकले होते.

यंदाच्या स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८७ मीटरच्या पुढे भाला फेकला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे नीरजचा हा प्रयत्न ग्राह्य धरला नाही. त्यानंतर नीरजला पुन्हा संधी देण्यात आली ज्यात त्याने ८२.३८ मीटर इतके अंतर पार केले. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने पहिल्या प्रयत्नाच्या आणखी थोडे पुढे भाला फेकला. यावेळी नीरजने ८४.४९ इतक्या लांब भाला फेकला. भारताच्या नीरज आणि किशोर कुमार यांच्यात सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी चुरस सुरू होती. अन्य एकही भालाफेकपटू नीरज आणि किशोरच्या जवळपास दिसत नव्हते. किशोरने तिसऱ्या प्रयत्नात ८७.७७ मीटर लांब भाला फेकला आणि नीरजला मागे टाकले. त्यानंतर नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.८८ मीटर लांब भाला फेकत किशोरला मागे टाकले.

नीरज

पहिला प्रयत्न – ८२.३८
दुसरा प्रयत्न – ८४.४९
तिसरा प्रयत्न – तांत्रिक कारणामुळे ग्राह्य नाही
चौथा प्रयत्न – ८८.८८

किशोर कुमार

पहिला प्रयत्न – ८१.२६
दुसरा प्रयत्न – ७९.७६
तिसरा प्रयत्न – ८६.७७
चौथा प्रयत्न – ८७.५४

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version