येरवड्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

येरवड्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

पुण्यातील येरवडा येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. यावेळी दुर्घटनेमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, पुण्यातील एका निर्माणाधीन इमारतीत झालेल्या दुर्घटनेबाबत दुखावलो आहे. त्यामुळे शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मला आशा आहे की, या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोल यांनी ट्विट केले की, ‘येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदून पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.’

पुण्यातील येरवडायेथील शास्त्रीनगरमध्ये एका मॉलचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी रात्री बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस आणि अग्निशमन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version