राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दरम्यान, ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून अनिल देशमुखांनी केलेला गौप्यस्फोट समोर आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब पोलिस बदल्यांची यादी द्यायचे, असा खळबळजनक आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे देशमुखांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल परब अडचणीत आले आहेत.
सक्तवसुली संचलनालयाने अनिल देशमुखांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात देशमुखांनी अनिल परबांवर आरोप केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब पोलिस बदल्यांची यादी द्यायचे, असा देशमुखांनी परबांवर केला आहे. तसेच परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात दिलेली यादी मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.
अनिल परब ही यादी कुठून आणायचे याबाबत ईडीने विचारणी केली असता, अनिल देशमुख जबाबात म्हटले, ‘शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे आणि त्यानंतर ही यादी मला पाठवायचे. यादीमध्ये आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावे अनिल परब यांच्याकडे देत त्यानंतर ही यादी तयार करून अनिल परब माझ्याकडे पाठवायचे’, असे देशमुख म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.