‘भरतीआधी हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र आवश्यक’

‘भरतीआधी हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र आवश्यक’

केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू तातडीने सुरु होणार आहे. त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली आहे. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवेत रुजू होता येणार नाही. सेनेच्या तीनही सेना दलांच्या वतीनं रविवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली. अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय वायुसेना २४ जूनपासून भरती मोहीम सुरु करणार असून १ जुलैला लष्कराची भरती होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं.

केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ  योजनेच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकाणी युवकांची निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये तर युवकांच्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झालं असून अनेक रेल्वेंना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी वयोमर्यादा आणखी दोन वर्षांनी वाढवली. तर संरक्षण मंत्रालय तसेच कोस्ट गार्डने या अग्निवीरांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सेनेच्या तीनही दलांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. ही सुधारणा या आधीच होणं आवश्यक होतं, १९८९ साली यावर काम सुरू झालं होतं असं लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलं.

लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की, येत्या २०३० सालापर्यंत ५० टक्के लोकसख्या ही २५ वर्षांच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश यांचं कॉम्बिनेशन असलेल्या युवकांची गरज आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version