झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे
झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा राखीपौर्णिमेच्या मुहूर्तावर मुंबईत आहे. याप्रसंगी झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी झिशान यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्याचवेळी झिशान यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली. पण झिशान यांनी पक्षांतर करणार नसल्याचे जाहीर केले. झिशान यांनी ही घोषणा केली तरी त्यांच्याकडून मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. या घटनेनंतर नाराज झालेल्या झिशान यांनी अखेर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

उच्च शिक्षण घेतलेले आमदार

लंडनच्या रीजेंट विद्यापीठातून व्यवस्थापन क्षेत्रातली पदवी घेऊन मायदेशी परतलेल्या झिशान यांनी २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. 

जनसन्मान यात्रेत झिशानना मान

मुंबईत जनसन्मान यात्रेत आमदार झिशान सिद्दीकी यांना मान देण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासोबत एका गाडीतून शेजारी उभा राहून झिशान मिरवणुकीत सहभागी झाला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version