MNS-Shivsena UBT BMC Election 2026 : मुंबई मनपासाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार ठरला? वार्ड क्रमांकावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सर्वपक्ष मुंबई पालिका निवडणुक आणि राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत.
MNS-Shivsena UBT BMC Election 2026 : मुंबई मनपासाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार ठरला? वार्ड क्रमांकावरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुंनी मोठा निर्णय घेतला. 

हेही वाचा- Prashant Jagtap : ठाकरेंची ऑफर नाकारून प्रशांत जगताप यांचा 'या' पक्षात अधिकृत प्रवेश

मुंबई महानगपालिका निवडणुकीपुर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षात युती झाल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. यानंतर मुंबई महानगपालिकेच्या पार्श्वभूमिवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे जागावाटप झाले असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंकडून पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. यावेळी दादरमधील मुंबई महापालिकेतील वार्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आला असून या वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार मुंबई महानगपालिकेची निवडणुक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- Pune Seat Sharing Dispute : पुण्यातील जागावाटपावरून शिवसैनिक खवळले, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा संताप

दरम्यान या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटात नाराजीनाट्य सुरु झाले आहे. यावेळी वॉर्ड क्रमांक 192 हा मनसेला देण्यात आल्यामुळे वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या. मात्र या निर्णयाने ठाकरेंच्या शिवसेनेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाखुश असल्याचं समोर येत आहे. वॉर्ड क्रमांक 192 शिवसेना ठाकरे गटाला मिळावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर हे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेणार आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version