Vidhan Parishad Election : "3 वाजेपर्यंत थांबा स्पष्ट चित्र पाहायला मिळणार" काँग्रेस विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार?

ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र या निर्णयानंतर मविआमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहेत.
Vidhan Parishad Election : &quot3 वाजेपर्यंत थांबा स्पष्ट चित्र पाहायला मिळणार" काँग्रेस विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या जागा साठी 12 मे रोजी मतदान होणार असून ही लढत विधान परिषदेच्या 9 जागांवर होणार आहे. महायुतीकडून 8 तर महाविकास आघाडीकडून 1 उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही आपला उमेदवार निश्चित केला आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना संधी देण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र या निर्णयानंतर मविआमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहेत. उबाठा गटाने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार जाहीर केल्यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमिवर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

हेही वाचा- NCP Vidhan Parishad : “माझ्या संघर्षाचं हेच फळ” राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकींना उमेदवारी जाहीर, अमोल मिटकरी यांचा नाराजीचा सूर?

नाना पटोले म्हणाले की, “कोणाला उमेदवार ठेवायचं नाही ठेवायचं हे त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे आमचा आग्रह होता की, उद्धव ठाकरे त्यामध्ये उमेदवार व्हावे असा आमचा आग्रह होता तो त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला… आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेला आहे तीन वाजेपर्यंत थांबा, त्यामध्ये स्पष्ट चित्र पाहायला मिळणार आहे, आज किती फॉर्म येतात त्यावर निवडणुकीचे भवितव्य आहे…  काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केल्यामुळे उमेदवार देणार,  राज्यसभेबाबत अजून तशी कुठलेही चर्चा झालेले नाही… दबाव तयार करण्याचं काही कारण नाही, राज्यसभेवर शरद पवार यांना पाठवण्याचा निर्णय सर्व एकमताने घेतला, उद्धव ठाकरे यांना विधान परिषद पाठवण्याचे निर्णय एकमताने घेतला होता मात्र त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला…

जे काही आहे ते तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार, फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरल्यानंतर समजेल… उद्धव ठाकरे यांचा पक्षाचा निर्णय आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल वक्तव्य करण्याचा कारण नाही… हाय कमांड या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे… विजय वडेट्टीवार हे आमदार आहेत त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना विजय भेटले असतील काही कामानिमित्त… पक्ष संघटने संदर्भात दिल्लीत हायकामांडची भेट घेतली… काँग्रेसचा उमेदवार राहिला तर तो निश्चित जिंकेल…कोणाला तिकीट द्यायची हा हाय कमांडचा विषय आहे… संजय राऊत यांनी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही जे भांडण लावण्याचा प्रयत्न करता ते मी करू देणार नाही… निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापले रणनीती करतो त्यामुळे आमचा उमेदवार जिंकेल तो कसा जिंकेल ते समीकरण मी इथे कसं सांगणार…”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version