छत्रपती संभाजीनगर बोर्डाने अखेर निकालाच्या दिवशी बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या दुसऱ्या हस्ताक्षराचा शोध लावला आहे. या ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच अक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांसह त्यांना मदत करणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यात एका प्राध्यापिकेचाही समावेश आहे. याप्रकरणी बोर्डाकडून सोयगाव तालुक्यातल्या फरदापुर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून इतर दोषींवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. उत्तर पत्रिकांच्या या घोळामुळे परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी १५ मे नंतर बोर्डासमोर केंद्रप्रमुख, केंद्रसंचालक, कस्टडियन, प्रवेक्षक, मॉडरेटर आदींची चौकशी झाली. दरम्यान, या काळात सदर उत्तर पत्रिकेमध्ये दुसरे हस्ताक्षर आपलं नसल्याचं विद्यार्थ्यांनी लेखी उत्तर बोर्डाकडे सादर केला होता. सदर उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील दोन शिक्षकांकडे गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होईल, असे सांगण्यात आले आहे.
बोर्डाला ३७२ विद्यार्थ्यांचा उत्तरपात्रिकेत एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले. यानंतर या प्रकरणी बोर्डाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, आता पोलीस तपासातच हे दुसरे हस्ताक्षर कोणाचे? यात काही आर्थिक व्यवहार झालेत का? यात प्रामुख्याने कोणती संस्था कोणते शिक्षक अथवा अधिकारी गुंतलेत का? संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि हस्ताक्षर बदल प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने प्रकरणाचे सर्व धागेधोर उघड होणार आहे.
बारावीचा विभागवार निकाल
कोकण ९६.०१ टक्के पुणे ९३.३४ टक्के कोल्हापूर ९३.२८ टक्के औरंगाबाद ९१.८५ टक्के नागपूर ९०.३५ टक्के अमरावती ९२.७५ टक्के नाशिक ९१.६६ टक्के लातूर ९०.३७ टक्के मुंबई ८८.१३ टक्के
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.