Sanjay Sirsat: "एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल" शिंदेंच्या टार्गेटवर कोण? शिरसाटांच्या वक्तव्याने खळबळ

संपूर्ण राज्यात गाजत असलेलं एकनाथ शिंदे यांचं 'ऑपरेशन टायगर' अजूनही थांबलेलं नाही. उलट ते अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.
Sanjay Sirsat: "एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल

महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर राजकीय वातावरण स्थिर होत आहे असं वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय खेळी अधिकच तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत असलेलं एकनाथ शिंदे यांचं ‘ऑपरेशन टायगर’ अजूनही थांबलेलं नाही. उलट ते अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरचा बळ आले आहे.

आमदार, खासदारांपासून अगदी शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांपर्यंत कित्येक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षात ठाकरेंच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू असून येत्या काळात आणखी काही नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. ‘ऑपरेशन टायगर ही एक मोठी प्रोसेस आहे. जेव्हा टार्गेट समोर येईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल’ शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या टारगेटवर कोण? याकडे सर्वांच लागलं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- Sunil Tatkare On Kishor Masal : दादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान भोवलं! नगरसेवकावर कठोर कारवाई, थेट पक्षातून हकालपट्टी

यावेळी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, “विधानपरिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरी दिसतेय ती थांबण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक दोन दिवसात बंडखोरी थांबेल. उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीमध्ये रहायचं नाही आहे. त्यांना तिकडे कोणी विचारत नाही. म्हणून ते VC वर join झाले आहे. उद्या ते काय करतील याचा काही नेम नाही. महाराष्ट्रात आता काही चालत नाही. भुजबळ का नाराज झाले याच्याशी आम्हाला काही घेण देणं नाही.”

“भुजबळ कोणाला उद्देशून बोलले हे ज्याने त्याने ठरवावं. भरत गोगावले पालकमंत्री व्हाव. तटकरे यांना जागा गेली म्हणजे पालकमंत्री भरत गोगावले. एका आठवड्यात घोषणा होऊ शकते. तटकरे थेट कसे बोलणार. वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला असेल असा आमचा समज आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीला गेले आहेत आणि जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा सर्व नेत्यांना भेटतात. ऑपरेशन टायगर ही प्रोसेस असते. जेव्हा टार्गेट समोर येईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version