Sanjay Kenekar : सहा महिन्यांपूर्वी एअरगन खरेदी, काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात; केनेकरांच्या कार्यालयात बंदूक ठेवणारा व्यक्ती नेमका कोण?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
Sanjay Kenekar :  सहा महिन्यांपूर्वी एअरगन खरेदी, काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात; केनेकरांच्या कार्यालयात बंदूक ठेवणारा व्यक्ती नेमका कोण?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कार्यालयात धाव घेऊन एअरगन व त्यासोबत असलेली बॅग जप्त केली. तसेच कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत एअरगनची तांत्रिक तपासणीही सुरू केली.

हेही वाचा- Akola Crime : दुचाकीवरून आला अन् दोन शाळकरी मुलीच्या…, CCTV मध्ये ‘तो’ प्रकार कैद; अकोल्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रितेश संतोष होळकर याला क्रांतीचौक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. रितेश बीएस्सीच्या तृतीय वर्षात असून तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केणेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला होता. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version