मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. १९७८ साली या प्रकाराचा सुरुवात शरद पवारांनीच केली होती आज शेवट त्यांच्याकडेच आला आहे. असा घणाघात राज यांनी पवारांवर साधला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
१९७८ साली या प्रकाराचा सुरुवात शरद पवारांनीच केली होती आज शेवट त्यांच्याकडेच आला आहे. त्याआधी किंवा नंतर असा प्रकार महाराष्ट्रात कधीच घडला नव्हता. घडलेला प्रकार अत्यंत किळसवाणा आहे हा राज्यातील मतदारांचा घोर अपमान आहे.. दिलिप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांच्यासारखे शरद पवारांचे कट्टर समर्थक दादासोबत गेल्यानं मला संशय आहे कि या सगळ्यामागे शरद पवारच असतील.महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दुर्देवी असून, कॅरम खूप वाईट फुटलाय, कुणाच्या सोंगट्या कुठल्या भोकात तेच कळनेसं झालय अशी मिश्किल टिपणी देखील राज यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.