Todays Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सर्वसामान्यांना खरेदीपूर्वी करावा लागतोय 100 वेळा विचार

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत आहे, आणि आजही बाजारात मोठा फेरबदल दिसून आला आहे. सोने आणि चांदीचे दर ऐकून सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 
Todays Gold-Silver Rate: सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सर्वसामान्यांना खरेदीपूर्वी करावा लागतोय 100 वेळा विचार

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत आहे, आणि आजही बाजारात मोठा फेरबदल दिसून आला आहे. अमेरिकेतून समोर आलेल्या कमकुवत रोजगार आकडेवारीमुळे जागतिक बाजारात व्याजदर कपातीच्या अपेक्षा बळावल्या आणि त्याचा थेट फायदा मौल्यवान धातूंना झाला. बुधवारी चांदीच्या दरात मोठी उसळली तर सोन्यात चढ-उतार पाहायला मिळाले. अशातच देशांतर्गत सराफा तसेच वायदा बाजारात खळबळ उडाली असून आता सोने आणि चांदीचे दर ऐकून सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Share Market Updates: सलग चौथ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण, सेंसेक्स आणि निफ्टीवर दबाव

दरम्यान आजचे सोन्याचे दर पाहता वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यानुसार भारतीय वायदा बाजारात सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 263 रुपयांनी कमी होऊन 1,34,631 रुपये झाले आहे. त्याचसोबत चांदीची किंमत 1187 रुपयांनी स्वस्त होऊन 1,06,251 रुपये किलोवर घसरली आहे. चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला असून वर्षाच्या सुरुवातीपासून चांदीची किंमत 135 टक्क्यांनी वाढली, जी याच कालावधीतील सोन्याच्या वाढीच्या जवळपास दुप्पट आहे.

हेही वाचा- Gold Silver Rates: सोने-चांदीची ऐतिहासिक झेप! दरांनी मोडले विक्रम; गुंतवणूकदार खूश, खरेदीदार चिंतेत

तर मुंबईतील सोन्याचे दर पाहायला गेलो तर देशांतर्गत सराफा बाजारात मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 1,34,520 रुपये, 22 कॅरेट सोन 1,23,310 रुपये आणि 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,00,890 रुपये झाला आहे. सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी वेळीच निर्णय घेणे गरजेचे ठरते. विशेषत: लग्न, सण वा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणार्‍यांनी सध्याच्या भावावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बाजारातील ताज्या घडामोडी पाहता, भविष्यातही सोन्याचे दर स्थिर राहतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version