‘होळीचा बेरंग करणाऱ्यांना आम्ही ‘रंग’ दाखवू’

‘होळीचा बेरंग करणाऱ्यांना आम्ही ‘रंग’ दाखवू’

मुंबईसह राज्यात होळीदहन केल्यानंतर आता धुलीवंदन उत्साहात साजरी केली जात आहे. धुलीवंदनादरम्यान काही ठिकाणी गालबोट लागतं.

काही जणं पक्क्या रंगाने धुलीवंदनाचा आनंद लुटतात. रंग लावल्याने तसेच इतर कारणाने वादाचे प्रसंग घडतात.

धुलीवंदनाचा निमित्ताने मुंबई पोलीस आयुक्तांनी एक भन्नाट ट्विट केलं आहे. होळीच्या समृद्ध रंगाचा बेरंग करणाऱ्यांबद्दल तक्रार करा, त्यांना आम्ही रंग दाखवू, असं ट्विट मुंबई पोलीस आयुक्तांच्या खात्यावरुन करण्यात आलं आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हे परमबीर सिंह हे आहेत. त्यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्र हाती घेतली आहेत.

देशासह राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version