MVA On Vidhan Parishad Election 2026 : महायुतीला तगड आव्हान! ‘आम्ही 17 जागा एकत्र लढणार’ मविआची मोठी घोषणा; कोणाच्या वाट्याला किती जागा?

विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महायुतीसोबतच महाविकास आघाडीमध्ये काय रणनिती असणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं असून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
MVA On Vidhan Parishad Election 2026 : महायुतीला तगड आव्हान! ‘आम्ही 17 जागा एकत्र लढणार’ मविआची मोठी घोषणा; कोणाच्या वाट्याला किती जागा?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 विधान परिषद जागासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीसोबतच महाविकास आघाडीमध्ये काय रणनिती असणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत. दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे 17 जागा लढवणार आहे. या 17 जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना पाच ते सहा जागा लढणार आहे. त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ते चार जागावर लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा या शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नंबर लागणार आहे. 

हेही वाचा- NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?
यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “जागावाटप संदर्भात आमची चर्चा झाली आहे. दोन दिवसांत पुन्हा बसून अंतिम जागा वाटप संपन्न होईल.. कोणतीही तिडा नाही. भाव उघडले अशा प्रकारचे शब्द प्रयोग निवडणुकीत समोर येत आहे. भाजपचे पाप आपल्या समोर येत आहे..पैसे फेक तमाशा देख अशी परिस्थिती सुरू आहे. त्याचा स्वतःवर आणि लोकशाही वर विश्वास नाही. म्हणून 5 लाख रुपये देऊन लोकांना उचलत आहेत. सर्वच जागेवर आम्ही लढणार आहोत. एक तारखेला सर्व स्पष्ट होईल.

इंडिया alliance सोबत आम्ही चर्चा करणार आहोत तसेच मित्र पक्ष सोबत चर्चा करू. Sir प्रक्रिया नेमकी जेव्हा दिंडी निघणार आहे..त्यात आषाढ महिन्यात sir प्रक्रिया ठेवली आहे. सरकारला माहिती नाही का मोठ्या संख्येने लोक वारीला जात असतात. भक्तांना मतदार यादीतून वगळण्याकरिता हा घात आहे..आम्ही हे होऊ देणार नाही. तीन तास रस्ता जाम केला..आज परिणामी सरकार मधील अर्थमंडळ दिल्लीला गेले..ही जनता आणि शेतकऱ्यांची टाकत आहे. दिल्लीत अहात खाली.हात परत येऊ नका यावर लक्ष द्या. सत्तेच्या डावपेचांचा खेळ आहे. महायुतीची संख्या बघता आम्ही त्यांना निवडणुकीला सामोरी जायची भूमिका आम्ही घेतली आहे. निवडणुकात उमेदवार आम्ही देणार या बाबत चर्चा झाली आहे.”
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version