Zombie Boys In Town : मिरा भाईंदरमध्येही झोंबी ड्रग्जची लागण?; एकाच जागी स्तब्ध उभ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

Zombie Boys In Town : मिरा भाईंदरमध्येही झोंबी ड्रग्जची लागण?; एकाच जागी स्तब्ध उभ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला असून ‘झोंबी ड्रग्स’चा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका तरुणाने हे घातक ड्रग्स घेतल्याचा संशय असून, रात्रीच्या सुमारास तो भर रस्त्यात विचित्र अवस्थेत आढळून आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण ड्रग्सच्या नशेत स्वतःवर ताबा गमावून अनियंत्रित हालचाली करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याबाहेर सुरू असलेले ड्रग्स रॅकेट आता मुंबईलगतच्या परिसरात पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Aaditya Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेत ऐतिहासिक बदलांची नांदी! आदित्य ठाकरे होणार पक्षाचे कार्याध्यक्ष? 2003 च्या इतिहासाची पुनरावृत्ती

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version