पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी सजावट

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठुराया तिरंगी रंगात न्हाऊन निघाला आहे.आज नेमकी वसंतपंचमी असून तिथीनुसार विठ्ठल रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाहसोहळा संपन्न झाला आहे. विठ्ठल मंदिरात दुपारी बारा वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी चौखांबी, सोलखंबीला तिरंगी फुलांची अतिशय आकर्षक सजावट केली आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही तिरंगी फूल सजावटीची सेवा अर्पण केली आहे.

विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी खास चेन्नई आणि बंगलोर इथून विवाहासाठीचे रेशमी पांढरे पोशाख आले आहेत. बंगळुरु इथल्या एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे. आज प्रजासत्ताक दिन आणि वसंत पंचमी असल्यामुळे दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक मंदिरात येत आहेत. पुण्याचे विठ्ठल भक्त भुजबळ कुटुंबीयांकडून ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version