येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच कामगारांचा मृत्यू तर पाच जखमी

येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; पाच कामगारांचा मृत्यू तर पाच जखमी

पुण्यात येरवाड्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. येरवडायेथील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला आहेत तर पाच कामागर गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील येरवडायेथील शास्त्रीनगरमध्ये एका मॉलचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी रात्री बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेमध्ये पाच कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्लॅबचा ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. यावेळी दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्यांच्या मदतीने हे बचाव कार्य करण्यात आले. तर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आले असून पाच गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री उशीरा येरवडा येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला. परंतु इतक्या उशीरा रात्री मॉलचे काम कसे सुरू होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version