मुंबईत जास्त प्रमाणात आत्महतेच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना घडली आहे. मुंबईत राहणाऱ्या पर्ल पंजाबी (31) वर्षीय तरुणीने गुरुवारी रात्री इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. लोखंडवाला येथे ती राहत होती. पर्ल पंजाबी अभिनेत्री होण्याकरिता स्ट्रगल करत होती.
जखमी असलेल्या तरुणीला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पंरतु तिथे तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. पर्ल पंजाबी ही तरुणी एका व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये एडिरचे काम करत होती. तिचे अभिनेत्री व्हायचे स्वप्न होते. त्यासाठी ती स्ट्रगल ही करत होती. ती आपल्या आईसोबत लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती.
तिच्या हत्येची कोणतीही शक्यता नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. तसा संशय पोलिसांना नाही. परंतु तिच्याजवळून सुसाइड नोट न मिळाल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. ओशिवरा येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे. तिची मानसिक स्थिती ही ठीक नव्हती. त्यावर तिचे उपचार सुरु होते. याआधी देखील तिने दोन वेळा आत्महतेचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी चालू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.