Cinema Hall Fire: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘द राजा साब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण असतानाच, ओडिशातील एका सिनेमागृहात चाहत्यांच्या अतिउत्साहाने भीषण स्वरूप धारण केले. प्रभासच्या पडद्यावरील एन्ट्रीचा आनंद साजरा करताना चाहत्यांनी थेट थिएटरमध्येच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
थिएटरमध्ये नेमकं काय घडलं?
ओडिशातील ‘अशोक टॉकीज’ मध्ये ‘द राजा साब’चा शो सुरू होता. प्रभास पडद्यावर येताच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. याच उत्साहात काही चाहत्यांनी केवळ कागद हवेत उडवून न थांबता, ते पेटवून दिले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, पडद्यासमोर काही तरुण पेटलेले कागद उडवत आहेत, ज्यामुळे मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला होता.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आणि प्रेक्षकांचा संताप
या प्रकारामुळे सिनेमागृहातील इतर प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र चाहत्यांच्या या ‘वेडेपणा’मुळे संपूर्ण थिएटर खाक होऊ शकले असते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या कृत्याचा तीव्र निषेध होत असून, अशा बेजबाबदार चाहत्यांमुळे प्रभासचेच नाव खराब होत असल्याची टीका नेटिझन्स करत आहेत.
ରାୟଗଡ଼ା ଅଶୋକ ଟକିଜ୍ରେ ସୁପରଷ୍ଟାର ପ୍ରଭାସଙ୍କ ଏଣ୍ଟ୍ରି ବେଳେ ସିନେମା ହଲ୍ ଭିତରେ ଲାଗିଲା ନିଆଁ..
'ଦି ରାଜା ସାହବ'ର ରିଲିଜ୍ ହୋଇଥିଲା ସ୍କ୍ରିନ ସାମ୍ନାରେ ଆଳତି କରିବା ବେଳେ ହଲ୍ ଭିତରେ ଲାଗିଯାଇଥିଲା ନିଆଁ #Rayagada #AshokTalkies #FireAccident pic.twitter.com/dbDRpPegbU — Bibhuti Bhusan Das (@bibhutids) January 10, 2026
हेही वाचा – Suresh Wadkar: ‘माधुरी खूप बारीक असल्याने…’ माधुरी दीक्षित आणि सुरेश वाडकर यांचं लग्न का झालं नाही?
‘द राजा साब’चा बॉक्स ऑफिसवर धमाका
वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही घटना घडली असली, तरी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई तब्बल 63.3 कोटी रुपये आहे. या चित्रपटात प्रभाससोबत संजय दत्त, बोमन इराणी आणि मालविका मोहनन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एका आजी (जरीना वहाब) आणि नातवाच्या (प्रभास) नात्यावर आधारित असून, बेपत्ता आजोबांचा (संजय दत्त) शोध घेण्याचा भावनिक प्रवास यात मांडण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.