साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी
अंबाबाईची मूर्तीच्या संवर्धनाला धोका निर्माण झाला आहे. मूर्तीच्या अनेक भागात झीज झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. भक्त कित्येक तास रांगेत उभे राहतात. मात्र अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन केलं जात आहे.
अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे. तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. दरम्यान पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये असं सांगितलं जातं, मात्र कित्येक वर्ष अंबाबाईची मूर्ती अभिषेक न घालताच पुजली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन दिलं जात आहे.

कोर्टाने या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली. पण बेजबाबदार सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणताच रिप्लाय दिला गेला नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मुर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. सध्या देवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे, त्या हाताची दोन बोटं पूर्णपणे झीजली आहे. तर म्हाळंग घेतलेल्या उजवा हाताच्या बोटाचीही पूर्ण झीज झाली आहे. तसंच पावलावरील बोटं पूर्णपणे निघून गेली आहेत आणि देवीचं वाहन असणारं सिंहाची पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली असून सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. तर देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट झालेत. यामुळे आता सरकार आणि पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.