Ladki Bahin Yojana : शासकीय कर्मचाऱ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणे भोवले; संपूर्ण लाभाची केली वसुली

बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता.
Ladki Bahin Yojana : शासकीय कर्मचाऱ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणे भोवले; संपूर्ण लाभाची केली वसुली

प्रफुल खंदारे, प्रतिनिधी 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता. शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. त्या प्रकरणाची चौकशी केली असता 190 कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत. तर उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16 हजार 500 असे एकूण 99 हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आले आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे.

हेही वाचा : Mahesh Manjrekar on Mumbai : 'मुंबईकरांचा श्वास कोंडतोय…'; ठाकरे बंधूंसमोर महेश मांजरेकरांनी व्यक्त केली दोन कोटी जनतेची खदखद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version