Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची तोफ पुन्हा मुंबईत धडकली! मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित

नुकतेच मुंबईतील सहा हॉटेल्सना 'मुंढे स्टाईल' कारवाईचा दणका दिला होता. यानंतर पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तोफ मुंबईत धडकली आहे.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची तोफ पुन्हा मुंबईत धडकली! मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची तोफ पुन्हा एकदा मुंबईत धडकली आहे. नुकतेच मुंबईतील सहा हॉटेल्सना ‘मुंढे स्टाईल’ कारवाईचा दणका दिला होता. तुकाराम मुंढे यांनी सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे, बोरीवली, भांडुप आणि नरिमन पॉइंट येथील बड्या समूहाच्या रेस्टॉरंटलाही सोडले नव्हते.

अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचा प्रकार आढूळ आल्यामुळे तुकाराम मुंढे यांनी हायप्रोफाईल रेस्टॉरंटचे लायसन्स निलंबित करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित अशा तीन हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

हेही वाचा- Ramesh Mhatre: रुग्णालयात गोंधळ घालताना रक्तदाब नॉर्मल; जेलची वारी होताच आजारपणाचं सोंग? रमेश म्हात्रे यांना 6 दिवसांतच जामीन मंजूर

यात भेंडीबाजार व उमरखाडीतील तीन नामांकित हॉटेलांचा समावेश आहे. यावेळी शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल,  रहमानिया रेस्टॉरंट मुंबईतील या तीन नामांकित या हॉटेल्सनी स्वच्छता, अन्नसुरक्षा व परवाना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी एफडीएने या तिन्ही हॉटेल्सवर कारवाई करत थेट त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेल्सची अचानक तपासणी केली असता, या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, कीटकांचा वावर आढळून आला, तसेच पिण्याच्या पाण्याबाबतचे नियमही या हॉटेल्सनी पाळले नसल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version