भुजबळांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त

भुजबळांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजाकडून संताप व्यक्त

छगन भुजबळांनी एका सभेदरम्यान ब्रह्माणांमध्ये कुठल्याही मुलांची नाव शिवाजी किंवा संभाजी नसतात. त्यांच्या याच वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत. भुजबळांच्या ह्याच वक्तव्यावरून मराठा समाजामध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे.

भुजबळांनी सभेत बोलल्या प्रमाणे सरस्वतीनी कुठं शाळा काढल्या का? कुठं कुणाला शिकवायला गेल्या का? महिलांना शिक्षण दिल का? याबद्द्ल प्रतिक्रिया देत दिलीप पाटील म्हणाले, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार वक्तव्य भुजबळ देत आहेत. महात्मा फुलेंनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलं, त्याची पुनरावृत्ती भुजबळ पुन्हा करणार आहेत का? हे मराठा विरोधी भुजबळ आहेत आणि मराठांच्या विरोधात तसेच मराठा आरक्षणा विरोधात नेहमीच लढा दिलेला आहे. त्याचबरोबर ‘मराठाविरोधी भुजबळ आता हिंदूविरोधी होतायत’. असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version