टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूला दुखापत

टीम इंडियाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूला दुखापत

मुंबई : वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शिखर धवन पाठोपाठ टीम इंडियाचा वेगवान बॉलर दुखापत झाला आहे. त्यामुळे विंडिज विरुद्ध होणारी वनडे मालिकेला त्याला मुकावे लागणार आहे. भुवनेश्वर कुमारला ही दुखापत झाली आहे.

भुवनेश्वर कुमार गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर आहे. विंडिज विरुद्धच्या सीरिजसाठी त्याची निवड करण्यात आली होती. पण आता भुवनेश्वर ऐवजी टीममध्ये आता मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने याबाबतचे ट्विट केले आहे.

विंडिजविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.

विंडिज विरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय सामने

पहिली वनडे – 15 डिसेंबर 2019, चेन्नई

दुसरी वनडे – 18 डिसेंबर 2019, विशाखापट्टणम

तिसरी वनडे – 22 डिसेंबर 2019, कटक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version