अमरावतीत बीएचएमएस विद्यार्थीनीची आत्महत्या

अमरावतीत बीएचएमएस विद्यार्थीनीची आत्महत्या

अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अमरावती शहरातील राजापेठ येथे होमिओपॅथि महाविद्यालयात शिकाणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अमरावती शहरातील राजापेठ येथील होमिओपॅथि महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. परभणी येथील ऋतुजा ढेंगरे असं मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे. ती  दुसऱ्या वर्षाला शिकत होती. महाविद्यालया मागे असलेल्या खासगी हॉस्टेलमध्ये तिसऱ्या माळ्यावर खोलीत ती राहत होती. सकाळी ती खाली न आल्याने केअरटेकरने तिच्या खोलीत पाहले असता गळफास घेतल्याचे लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आत्महत्याचे कारण मात्र कळू शकले नाही अधिक तपास पोलीस करीत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून अद्याप या आत्महत्येचे कारण समोर आले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version