अल्पवयीन मुलीचा तिसरा बालविवाह रोखण्यात यश

अल्पवयीन मुलीचा तिसरा बालविवाह रोखण्यात यश

बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा तीन वेळा बालविवाह करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचा तिसऱ्यांदा होत असणारा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मुलीचा बालविवाह तीन वेळा का झाला? याची कारणे काय आहेत? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले असल्याचेही समोर आले आहे. एकाच मुलीचा तीन वेळेस विवाह झाल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे. वारंवार समज देऊनही मुलींच्या घरच्यांनी विवाह लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, आई-वडिलांसह ३८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात याला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version