पहलगाम घटनेनंतर विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे; माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे'.
पहलगाम घटनेनंतर विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे; माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

नवी दिल्ली: राज्यसभा खासदार आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'मी पंतप्रधानांना काही सूचना देऊ इच्छितो. नुकताच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या घटनेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे आणि सर्वांकडून सूचना घेतल्या पाहिजेत. कारण देश त्यांच्यासोबत उभा आहे. दहशतवादी हा दहशतवादी असतो, दुसरे काही नाही. दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो. सर्वांनी एकमताने हा ठराव मंजूर करून देशाची भावना जगासमोर व्यक्त केली पाहिजे. आपण आफ्रिका, अमेरिका, युरोप, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया आणि दक्षिण अमेरिका यासारख्या देशांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले पाहिजे. जेणेकरून आपण त्यांना जागतिक पातळीवरील परिस्थितीबद्दल सांगू शकू. जर आपण हे पाऊल उचलले नाही, तर आपण राजनैतिक दबाव निर्माण करू शकणार नाही', असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती केली आहे.

हेही वाचा: श्रीनगरहून 183 पर्यटक महाराष्ट्रात परतले; प्रवाशांसोबत मुरलीधर मोहोळ यांनी साधला संवाद

पत्रकार परिषदेत बोलताना माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत व्यापार करणाऱ्या सर्व प्रमुख राष्ट्रांना आपण हे सांगायला पाहिजे की जर त्यांचा पाकिस्तानसोबत व्यापार असेल तर त्यांनी आमच्या बाजारपेठेत अजिबात येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने अमेरिका इतर राष्ट्रांसोबत व्यवहार करतो तसेच तुम्ही देखील करा. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा राहील'.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version