आपल्या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंढे यांच्या संवादाचा कार्यक्रम शनिवारी 1 ऑगस्ट रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी 21 वर्षांपूर्वी आपण अमरावतीत युपीएससी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळचा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला. तसेच तुकाराम मुंढे यांची गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली झाली असून पुन्हा दीड महिन्यात तुकाराम मुंढे यांच्यावर आता अन्न आणि औषध प्रशासनया संवेदनशील विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सतत होणाऱ्या बदल्यांवर, डिजिटलचा तरुणांवर होणारा परिणाम याबद्दल युवकांना सल्ला दिला.
सतत होणाऱ्या बदल्यांवर मुढेंची मिश्किल टिप्पणी
माझ्या बदल्या आणि एवढ्या गुणाचा मी कधी झालो हे माहित नव्हतं.. नियमाच्या बाहेर जायचं नाही.. म्हणून मला नियम घालून दिला आहे.. विद्यार्थ्यांना फक्त करिअर बद्दल मार्गदर्शन करायचं आहे. मागील 20 ते 25 वर्षात आमच्या बुडाखालून एवढं पाणी गेलं सांगू शकत नाही.. त्यावेळी पुस्तक शोधणे तर सोडा ज्ञान देखील शोधण्याची गरज नाही.. कारण ज्ञान तुमच्या खिशात आहे..
तुकाराम मुंढेंचा युवकांना सल्ला
एवढ तंत्रज्ञान पुढे गेलाय.. भविष्यात कोणत्या गोष्टीची गरज या दृष्टीने आपल्याला काम करण्याची गरज डिजिटल युगात मोबाईल मधून बाहेर येणे अशक्य.. त्याचा वापर करावा.. मात्र मोबाईल आपल्याला वापरायचं की आपण मोबाईल वापरायचं याच विचार करायला हवं.. कोणतीही गोष्ट हाताळत आहोत.. याचा विचार करणे गरजेचे.. ज्ञानापासून विवेकापर्यंत पोहचणे गरजेचे.. त्यासाठी प्रत्येक गोष्टीला प्रश्न करणे ही स्कील आपल्याला अवगत करणे गरजचे..
आपण रिल पाहतो ती किती खरी किंवा आपल्याला पाठविला याचा उद्देश काय याची पडताळणी करा.. आज मला आवडत हे ऐकण्याची तयारी मात्र मला आवडत नाही ते ऐकण्याची माझी तयारी नाही.. त्यामुळे डिजिटल अँप मुळात वाईट नाही.. त्याला वापरायचं कस हे आपल्याला ठरवायचं आहे.. आगीचा उद्देश जंगल जाळण्यासाठी की स्वयंपाक करण्यासाठी करायचं हे आपल्याला ठरवायचं.. कोणतीही गोष्ट आपण शेअर करतो तेव्हा ती चांगली की वाईट हे जाणून घेणे आवश्यक..
AI च्या दुनियेत आपण टिकू शकणार नाही.
थोर महापुरुषांनी आपल्याला शिक्षण शिकण्याचे आणि न शिकण्याचे धडे दिलेत.. आज AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज. आज सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनभर शिकण्याची सवय लावून घेणे गरजचे.. नाहीत AI च्या दुनियेत आपण टिकू शकणार नाही.. मशीनचा वापर किती आणि कसा करायचा याचा तारतम्य आपल्याला बाळगणे गरजेचे.. आज आपण महासत्ता बनण्यासाठी स्वप्न बघतो.. यात वाईट नाही मात्र.. आधी जगात महासत्तेसाठी अनेक युद्ध झालेत.. मात्र आता सुरू असलेले युद्ध विचाराचे आहेत..
झुंडशाहीत आपण वाहत चाललोय.
आज इंस्टाग्राम, सोशल मीडियावरून विचार एकाकी करण्याचे काम सुरु.. आपण प्रवाहात वाहून जातोय.. मग तो प्रवाह योग्य दिशा निवडून असला पाहिजे. आणि निवडला गेलेला प्रवाह तुमच्या पर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजासाठी असायला हवं.. आज झुंडशाहीत आपण वाहत चाललोय.. प्रवाहसोबत वाहत चाललो… राजाने सांगितलं म्हणून अधिकाऱ्याने मारलं ते नियमानुसार योग्य मात्र नियतीने अयोग्य.. हिटलरने केलं ती विचारशून्यता होती.. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा.. आणि आम्ही घरातील घाण बाहेर उघड्यावर टाकणार..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.