राज्यसभेसाठी महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजपाचे तीन उमदेवार, शिवसेनेचे दोन उमेदवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमदेवार असे सात उमेदवार राज्यसभेसाठी निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेसाठी भाजपाकडून तीन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपाने राज्यसभा उमेदवारीतून एक उमेदवार कमी करण्यासाठी मविआ प्रतिनिधिंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मलबार हिल येथील फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला मविआचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेकडून खासदार आणि पक्षसचिव अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार उपस्थित होते. यावेळी भाजपाने एक उमेदवार मागे घेण्याचा प्रस्ताव भाजपापुढे मांडला. मात्र, मविआची मांडवली फसली असून भाजपाने मविआचा दबाव झुगारला आहे.
राज्यसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात जागा सहा आणि उमेदवार सात अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आज मविआच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी मविआ प्रतिनिधींनी भाजपाने त्यांच्या तीन उमेदवारांपैकी १ उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. भाजपाने एक उमेदवार मागे घेतल्यास मविआ त्यांना विधान परिषदेत मदत करणार असल्याचा प्रस्ताव त्यांनी भाजपासमोर मांडला.
मात्र, भाजपाने मविआची मांडवली धुडकावून लावली आहे. भाजपाला राज्यसभा निवडणूक जास्त महत्त्वाची असल्याचे भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. तसेच राज्यसभेत मविआच्या मतांपेक्षा उमेदवार जास्त असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मविआने एक उमेदवार बसवला तर विधान परिषद निवडणुकीत भाजपा पाचवा उमेदवार देणार नसल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
यापूर्वी भाजपाने मविआला तीनवेळा सहकार्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर निवड विनासायास झाली.
कोरोनाकाळ असूनही विधान परिषद निवडणूक घेत उद्धव यांचा मार्ग प्रशस्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंच्या विना तक्रार विधान परिषद निवड होण्यात लक्ष घातले.
राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना बिनविरोध विधान परिषदेवर जाऊ दिले.
रजनी पाटील यांच्याविरोधातही भाजपा निवडणूक लढला नाही.
आता सहकार्य करा. राज्यसभेत मदत करतो असा माविआचा शब्द होता.
मविआने दिलेला शब्द पाळावा अशी महाराष्ट्र भाजपाची अपेक्षा आहे.
पीयूष गोयल विद्यमान केंद्रीय मंत्री आणि नेता, भाजपा
डॉ. अनिल बोंडे, माजी कृषीमंत्री आणि नेता, भाजपा
धनंजय महाडिक, नेता, भाजपा
संजय राऊत, संसदीय गटनेता, शिवसेना
संजय पवार, जिल्हाप्रमुख, कोल्हापूर (ग्रामीण)
प्रफुल्ल पटेल, नेता राष्ट्रवादी आणि माजी केंद्रीय मंत्री
इम्रान प्रतापगढी अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, काँग्रेस
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.