Shrikant Shinde : मोठी बातमी! श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पद मिळणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं?

शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Shrikant Shinde : मोठी बातमी! श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पद मिळणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय झालं?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पद भेटणार असून याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे डॉक्टर असल्यामुळे त्यांना आरोग्य मंत्री पद घ्या अशा थेट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचा- Sunil Tatkare : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत भूकंप! त्या नोटिशीवर तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; “…नंतरच कारवाई करु”

एकीकडे ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू असताना कोणाच्या पदरात मंत्रीपद पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय आरोग्य मंत्री पद मिळणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तसेच आज संध्याकाळी 4 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेनेच्या खासदारांना चार्टड विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना होते. 

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेटमंत्री व राज्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना यात खासदार श्रीकांत शिंदे यांना आरोग्य मंत्री पद दिले जाणार असल्याचे समजते आहे. दरम्यान आता राज्यमंत्री पदासाठी नव्याने आलेल्या ठाकरे गटातील 6 खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर असून याबाबत काय निर्णय होते हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version