Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणात ‘नेपाळी कनेक्शन’चा खळबळजनक दावा; संजय राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

ठाकरे कुटुंबाला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी एक मोठा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणात ‘नेपाळी कनेक्शन’चा खळबळजनक दावा; संजय राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut in Disha Salian case: दिशा सालियन हिच्या वडिलांकडून आदित्य ठाकरेंना 'मातोश्री'वर जाऊन अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस दिली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला आहे. 'हे सर्व नौटंकी आणि नाटक बंद झाले पाहिजे,' अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सीबीआयने या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून, न्यायालयानेही कोणालाही आरोपी मानलेले नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्यासाठी 'नेपाळी कनेक्शन'मधून पैशांच्या पुरवठ्याचा दावा
ठाकरे कुटुंबाला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी एक मोठा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही बेवडे आणि ऊर बडवे एकत्र येऊन ही कटकारस्थाने करत असल्याचे सांगत, यामागे 'नेपाळी कनेक्शन' असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील एका विशिष्ट नेत्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्यासाठी या नेपाळी कनेक्शनमधून मोठा आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंच्या गुजरातमधील भाषणावर राऊतांची खोचक टोलेबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये जाऊन गुजरातीत भाषण करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. भाजपचे मुख्यालय आणि प्रमुख नेते गुजरातचे असल्याने, आपल्या वरिष्ठांना खूश करण्यासाठीच शिंदे गुजरातीत बोलले असावेत, असा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उत्तम मराठी येते आणि पंतप्रधान मोदींचे मराठी हे शिंदेंपेक्षाही खूप चांगले आहे, असा मिश्किल टोला त्यांनी या वेळी लगावला.

हेही वाचा – Sharad Pawar NCP : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिला आघाडी नेतृत्वात बदल; विदर्भातील 'या' महिला नेत्याला मिळू शकते संधी, लवकरच होणार घोषणा

मराठी भाषेचा आदर आणि छत्रपती शिवरायांच्या स्वाभिमानाची आठवण
महाराष्ट्रातील नेत्यांच्या भाषिक अस्मितेवर बोलताना राऊत म्हणाले की, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला. वसंतदादा पाटलांना हिंदी येत नव्हतं त्यामुळे ते दिल्लीत मराठीतच बोलायचे. मराठीत बोलल्याने नेतृत्व उजळत नाही, असे जर कोणाला वाटत असेल, तर तो थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा अवमान असल्याचे राऊत यांनी निक्षून सांगितले.

शिंदे गटाच्या राजकीय भूमिकेवर राऊतांचा संताप
दुसऱ्या भाषेत बोलणे चुकीचे नसले, तरी शिंदे गटाचा पक्षच मुळात गुजरातधार्जिणा असल्यामुळे त्यांना तिकडे जाऊन गुजरातीत बोलावेसे वाटले, असा चिमटा राऊत यांनी काढला. ठाकरे कुटुंबाविरुद्ध चालवलेले हे कारस्थान आणि राजकीय स्टंटबाजी महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवले जाईल असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा – Sharad Pawar : 'शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, तर शेतमजूरांना 25 हजारांची मदत जाहीर करा'; पवारांची थेट पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version