Sahdev Betkar : रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का! सहदेव बेटकर यांनी शिवबंधन तोडले; लवकरच हातात घेणार कमळ

Sahdev Betkar : रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का! सहदेव बेटकर यांनी शिवबंधन तोडले; लवकरच हातात घेणार कमळ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख आणि बहुजन समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, 8 एप्रिल 2025 रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणारे बेटकर आता भाजपच्या वाटेवर असून बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या घडामोडीमुळे रत्नागिरीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : Abhijeet Dipke CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण; गर्दीचा फायदा घेतला अन्…

मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले सहदेव बेटकर हे कुणबी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. ओबीसी समाजामध्येही त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी ठाकरे सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version