मुंबई : शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार फुटल्यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वरळीचे शिलेदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज शिवसेनेकडून दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. सचिन अहिर यांच्या या कृत्यांने राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ माजली. वरळी मतदारसंघाचे आमदारपद भूषवणारे सचिन अहिर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसाठी हा मतदारसंघ सोडला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेचे आमदारपद देण्यात आलं. त्यांच्या या धक्कातंत्रानंतर सचिन अहिर यांनी यामागची भूमिका मांडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.