रिझर्व्ह बँक केंद्राला आर्थिक मदत करणार

रिझर्व्ह बँक केंद्राला आर्थिक मदत करणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या अर्थचक्राला विळखा घातल्याने केंद्र सरकारपुढे अनेक आर्थिक आव्हाने उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकने आपल्याकडील अतिरिक्त निधीतील ९९,१२२ कोटी रुपये केंद्राला देण्याचा निर्णय घेतला आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. २०१९-२० मध्ये रिझर्व्ह बँकेने ५७,१२८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्र सरकारला दिला होता. तर त्याआधीच्या, २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात १.७६ लाख कोटी इतकी रक्कम बँकेने केंद्राला दिली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version