Maharashtra Politcs : ‘आगामी काळात ठाकरे-शिंदे एकत्र येतील, तर 15 दिवसांत राष्ट्रवादी…’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

अमरावतीच्या बडनेरा विधानसभा चे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर  खळबळजनक भविष्यवाणी केली आहे.
Maharashtra Politcs : ‘आगामी काळात ठाकरे-शिंदे एकत्र येतील, तर 15 दिवसांत राष्ट्रवादी…’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

ध्या राज्यातील राजकारणा वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच काही वेगवेगळी समिकरणांची चर्चा ही सुरू झाली आहे. अशातच अमरावतीच्या बडनेरा विधानसभाचे आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर  खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. एकीकडे त्यांनी शिवसेनेच्या एकबाबत वक्तव्य केलं आहे.

तर दुसरीकडे त्यांनी राष्ट्रवादीच्या आगामी वाटचालीवर ही भाष्ट केलं आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते आणि येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. आगामी 15 दिवसांत राष्ट्रवादी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा- Dattatray Bharne: फडणवीस केंद्रात जाणार? मुख्यमंत्रिपदासाठी दत्तात्रय भरणे यांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव

तसेच, भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री बनतील आणि सुमित्रा पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी असेल, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी हनुमान चालीसाला विरोध केल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले आणि आमदार-खासदारही त्यांना सोडून गेले.

परंतु, आता त्यांनी पुन्हा एकदा हनुमान चालीसा हातात घेतली असून 18 तारखेला ते नागपूर येथील राम मंदिरात येत आहेत. ठाकरे आता राम भगवान आणि बजरंगबली यांच्या विचारांकडे परत आले असल्याने, भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील असे चित्र पाहायला मिळू शकते. राणा यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळी हालचाल पाहायला मिळत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version