Rajesh Kshirsagar Video: समोर आला शिंदेंच्या ‘त्या’ आमदाराचा कथित धक्कादायक व्हिडीओ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या व्हिडिओमुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
Rajesh Kshirsagar Video: समोर आला शिंदेंच्या ‘त्या’ आमदाराचा कथित धक्कादायक व्हिडीओ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये ते टक्केवारीच्या स्वरूपात पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा व्हिडिओ समोर आणला असून, त्यांनी गंभीर आरोप करत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

या प्रकरणावर अद्याप आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि पार्श्वभूमी याबाबत चौकशीची मागणीही काही स्तरातून करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version