‘जातीवादाला शरद पवार जबाबादार’

महाराष्ट्रात वाढत असलेल्या जातीवादासाठी शरद पवारच जबाबदार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
‘जातीवादाला शरद पवार जबाबादार’

नागपूर : महाराष्ट्रात वाढत असलेल्या जातीवादासाठी शरद पवारच जबाबदार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होईल, अशी शक्यता राज ठाकरेंनी व्यक्त केली. राज्यात सध्या जी राजकीय स्थिती आहे तशी याआधी कधीच नव्हती. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटप आणि तिकिटांच्या वाटपावरुन अंतर्गत वादाची शक्यता आहे. याउलट मनसे यंदा विधानसभेच्या जास्तीत जागा स्वतंत्रपणे लढणार आहे; असे राज ठाकरे म्हणाले. वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार असल्याचेही राज यांनी जाहीर केले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version