Radhakrishn Vikhe Patil : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून उद्या, 30 मेपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
Radhakrishn Vikhe Patil : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून उद्या, 30 मेपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. तसेच आता आरपारची लढाई असून, रणरणत्या उन्हात सर्व गोष्टींचा त्याग करून खाटेवर बसून उपोषण करणार असल्याचा कठोर निर्णय जरांगे पाटील यांनी घेतल्याचे यावेळी म्हटले आहे. दरम्यान, या गंभीर विषयात राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले असून जरांगे पाटील आंदोलन मागे घेतील का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा : Pimpri Chinchwad News : पुणे- पिंपरी चिंचवड हादरवणाऱ्या प्रकरणात मोठी अपडेट! 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

काय म्हणाले विखे पाटील 

सरकारची भूमिका नेहमीच स्पष्ट आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा मुद्दा होता तो देखील पूर्ण करण्याचा सकारात्मक भूमिका राज्य सरकारची आहे. मला अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार नाही. जरांगे पाटील यांच्यासोबत माझा संवाद झाला नाही. पण मी आज अंतरवाली सराटीला जाणार आहे. राज्य सरकारने काहीच केले नाही, असे बोलणे चुकीचे आहे. आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंद निघाल्या आहे. अडीच लाखापेक्षा जास्त दाखले आपण दिले आहे. मी आज त्यांची भेट घातल्यानंतर त्यांना टोकाचा पाऊल उचलण्यासाठी थांबण्याचा प्रयत्न करेन. आमची अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार नाही. आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली होती. जरांगे पाटील यांना काही गैरसमज झाला आहे. मी आज भेटून वस्तुस्थिती सांगेन, असे विखे पाटलांनी नमूद केले.  

पुढे विखे पाटील यांनी नमूद केले की, माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील. सातारा गॅजेटबाबत काही अडचणी आहेत. काही अडचण सांगितल्यानंतर मला वाटत नाही ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील. 2014 ते 2019 मध्ये जे मोर्चे निघाले. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आरक्षण देण्याची भूमिका त्यांची होती. मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही. आमच्या सरकारने आरक्षण दिले. जरांगे पाटील यांची मराठा समाजाबाबतची भावना त्याचा आदर आहे. 961 गुन्हे आहेत. यातील बहुतांश गुन्हे मागे घेतलेले आहेत. 64 गुन्हे फक्त राहिलेले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version