‘पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले’

‘पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले’

शुक्रवारी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे.  या बैठकीवर बोलत असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत ट्विट केलं आहे.  एकीकडे पंतप्रधान मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत.  मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत.  एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे.  सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे.  उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसत आहे.  त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत.  पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे.  २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version