महापुरात गोदापार्कची हानी, तरी गोदाकाठी आणखी एका प्रोजेक्टची तयारी?

महापुरात गोदापार्कची हानी, तरी गोदाकाठी आणखी एका प्रोजेक्टची तयारी?

नाशिकमधे आलेल्या पुरात राज ठाकरे यांनी उभं केलेलं गोदापार्क वाहून गेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात होणाऱ्या ‘गोदा प्रोजेक्ट’वर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ‘जुनं गंगेला मिळालं अन् प्रशासन नव्याच्या मागे पळालं’ अशी गत सध्या स्मार्ट सिटीच्या कामांची सुरू आहे. विशेष म्हणजे गोदावरीच्या काठावर बांधलेला जुनं गोदापार्क वाहून गेल्यानंतरही नवीन गोदा प्रोजेक्ट गोदावरी नदीच्या बाजूलाच करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिकच्या आसाराम बापू आश्रमाजवळ बांधलेला जवळपास 300 मिटरचा गोदापार्क महापुरात अक्षरशः वाहुन गेला आहे.

या गोदापार्कसाठी स्वतः राज ठाकरे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.

रिलायन्स कंपनीच्या मदतीनं हा प्रोजेक्ट उभा करण्यात आला होता.

मात्र पुरामुळे या गोदापार्कची दैना उडाली असताना नवीन गोदा प्रकल्प कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘गोदापार्क’ला महापुराचा फटका!

आणखी एक गोदा प्रोजेक्ट?

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या रामवाडी ते टाळकुटेश्वर पर्यंत आणखी एक गोदाप्रोजेक्ट उभा करण्याची तयारी सुरु आहे.

या नव्या गोदाप्रोजेक्टमधे एम्पिथिएटर, चिल्ड्रन्स प्लॅ एरिया, गार्डन, सिटआउट, वॉकिंग  एरिया, कॅफॅटेरिया यासह अनेक एमिनिटिज असणार आहेत.

मात्र पुराचं पाणी वाढल्यास या नव्या गोदाप्रोजेक्टचं काय अस प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकल्पाची जागा बदलण्याची मागणी होत असताना या प्रकल्प संदर्भात फक्त नव्याने अभ्यास करू अशी स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

दुसरीकडे शहरातील ब्लू लाईन आणि रेड लाईनची आखणी वरच अनेक सवाल उपस्थित होत आहे.

अशी परिस्थिती असताना गोदावरी नदी परिसरात बांधकाम कारणं चुकीचं आहे असं मत काही अभ्यासकांचं आहे.  महापुराचं पाणी जर गोदाप्रोजेक्टमध्ये शिरलं, तर या प्रकल्पाचं नुकसान तर होईलच आणि करोडो रुपये पाण्यात वाहून जातील. त्यामुळे त्याची तात्काळ प्रस्तावित जागा बदलावी अशी मागणी शहरातील गोदावरी प्रेमींनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version